Home महाराष्ट्र शासन विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

0

विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. श्री.डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर श्री.अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत.

सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here