Home Uncategorized 2025 पर्यंत अंतराळात भरारी घेणारा पहिला भारतीय आणि खोल समुद्रात उतरणारे आणखी...

2025 पर्यंत अंतराळात भरारी घेणारा पहिला भारतीय आणि खोल समुद्रात उतरणारे आणखी भारतीय जगाला पहायला मिळणार – केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

0

2025 पर्यंत अंतराळात भरारी घेणारा पहिला भारतीय आणि खोल समुद्रात उतरणारे आणखी भारतीय जगाला दिसतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह यांनी आज येथे एका वृत्तवाहिनीच्या मंचावरून संबोधित करताना केले.

अंतराळ आणि सागरी क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीविषयी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी- गगनयानसाठी चार अंतराळवीर-तीन ग्रुप कॅप्टन आणि एका विंग कमांडरची निवड करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, भारताच्या डीप-सी मिशनमध्ये 2025 मध्ये तीन भारतीयांना खोल समुद्रात पाठवले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, “2022 मध्ये देशात  फक्त एक स्पेस स्टार्टअप होता आणि 2024 मध्ये खाजगी सहभागासाठी अवकाश क्षेत्र खुले केल्यानंतर आपल्याकडे  आता जवळपास 200 स्टार्टअप्स आहेत आणि त्यापैकी अनेक जागतिक क्षमतेचे आहेत.  अवघ्या काही महिन्यांत अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रातून 1000 कोटींची गुंतवणूक झाली असल्याची ही माहिती त्यांनी दिली.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “आपल्याकडे राष्ट्रीय  क्वांटम मिशन असल्यामुळे भारत क्वांटम तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here