Home पुणे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा जाहीर निषेध!

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा जाहीर निषेध!

0

गेली १० वर्षे देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताकडे अक्षम्य दुर्लक्ष करत मनमानी कारभार करणाऱ्या केंद्र व महायुती सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर चिखलफेक आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रासह देशभरात जातीवाद, बेरोजगारी, पेपरफुटी, औद्योगिक अधोगती, शेतकरी आत्महत्या , कष्टकरी, कामगार वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष, महिला असुरक्षितता, अमली पदार्थांचा विळखा, सातत्याने घडणाऱ्या अपघाताच्या घटना अशा अनेक विषयात सरकारला आलेल्या अपयशाचा जाहीर निषेध केला.

महाराष्ट्रात सातत्याने होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, महागाई, अमली पदार्थ, पेपरफुटी, स्पर्धा परीक्षा वेळापत्रक अनियमितता, पोलीस भरती वयोमर्यादा, महिला असुरक्षितता या आणि अशा अनेक विषयांवर सरकारचे लक्ष वेधले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, अभय छाजेड, कमल व्यवहारे, आबा बागुल, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, गोपाल तिवारी,अरविंद शिंदे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here