Home महाराष्ट्र शासन बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी – मंत्री उदय सामंत

बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी – मंत्री उदय सामंत

0

मुंबईतील बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपांसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य लहू कानडे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, बेस्टच्या भंगार बस आणि भंगार माल विक्रीबाबत ई-लिलाव पद्धत अवलंबली जाते. तरीही, याबाबतचे आक्षेप लक्षात घेत याप्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य ॲड. आशिष शेलार, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here