Home मनोरंजन ‘सरफिरा’ हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट – अक्षय कुमार

‘सरफिरा’ हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट – अक्षय कुमार

0

अक्षय कुमार 12 जुलै रोजी ‘सरफिरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, अभिनेता दिल्ली आणि पुण्यात त्याच प्रमोशन करताना दिसला. शहरांमध्ये काही खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

या चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, “हा माझा 150 वा चित्रपट आहे आणि हा माझा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. मला हा चित्रपट आणि त्यात भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी सुधाचा खूप आभारी आहे”.

सरफिराचा प्रचार सध्या जोरदार आहे. . ‘सरफिरा’ चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला ‘सरफिरा’चा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाल्याच्या २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला.

आयएमडीबी च्या रेटिंगनुसार, ‘सरफिरा’ हा जुलै २०२४ चा सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट आहे. याने इंडियन 2 आणि बॅड न्यूज या चित्रपटांना मागे टाकत पाहिले स्थान पटकावले आहे.

सरफिरा हा जीआर गोपीनाथ यांच्या खऱ्या जीवनातील कथेवर आधारित आहे. ज्यांनी सर्वसामान्यांसाठी किफायतशीर विमान वाहतूक शक्य केली. सुधा कोंगारा दिग्दर्शित हा चित्रपट 5 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सूरराई पोत्रू या चित्रपटाचे अधिकृत रूपांतर आहे.

सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी लिहिलेले, संवाद पूजा तोलानी आणि जी.व्ही. प्रकाश कुमार यांच्या संगीतासह, सरफिराची निर्मिती अरुणा भाटिया (केप ऑफ गुड फिल्म्स), दक्षिण सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिका (2डी एंटरटेनमेंट) आणि विक्रम मल्होत्रा (अबंडंटिया एंटरटेनमेंट) यांनी केली आहे. 12 जुलै रोजी देशभरात प्रदर्शित होणारा, ”सराफिरा” आपल्या दमदार कथेने प्रेक्षकांना भुरळ घालण्याचे वचन देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here