Home Uncategorized सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट

0

हवामान विभागाने सातारा जिल्यामध्ये दि. ८ ते ९ जुलै या  कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान  होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी  काळजी घ्यावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.

  • दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी व  स्वत:हुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
  • मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.
  • नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
  • जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
  • नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
  • पर्यटन स्थळे उदा. धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाणेचे टाळावे.
  • पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली  आश्रय घेऊ नका, व मोबाईलचा वापर करू नका .
  • प्रवास करतेवेळी घाट रस्याासत विनाकारण थांबु नये.

अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here