Home महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अतिरिक्त कार्यभाराबाबत लवकरच निर्णय –मंत्री चंद्रकांत पाटील

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अतिरिक्त कार्यभाराबाबत लवकरच निर्णय –मंत्री चंद्रकांत पाटील

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४५ विभाग आहेत. त्यातील ३७ खात्यांना नियमित प्राध्यापकाकडे प्रत्येकी एकच विषय आहे.उर्वरित ८ खातेप्रमुखाकडे अतिरिक्त पदभार आहेत.यांचे पदभार कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्या विभागप्रमुखांकडे अतिरिक्त कार्यभार आहे त्याबाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर उच्च व  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४० पदांचा कार्यभार केवळ ११ प्राध्यापकांवर सोपविला असल्याबाबत विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here