Home महाराष्ट्र शासन सिल्लोड तालुक्यातील३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच निर्णय –मंत्री छगन भुजबळ

सिल्लोड तालुक्यातील३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच निर्णय –मंत्री छगन भुजबळ

0

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील ३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच कार्यवाही करणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यातील ८ हजार ९२१ शेतकरी लाभार्थ्यांच्या कार्डची छाननी केली आहे. त्यापैकी १९९५ रेशन कार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यातील १५०३ रेशन कार्ड धारकांना धान्याची मागणी केली आहे त्याप्रमाणे त्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे. डीबीटीमध्ये पात्र असलेली २२८५ रेशनकार्ड धारक आहेत. जी कोणत्याच निकषात बसत नाहीत अशी १२४ कार्डधारक आहेत. ज्यामध्ये काही ना काही त्रुटी आहेत अशी ३४०० रेशनकार्ड धारक आहेत याबाबतीतही लवकरच कार्यवाही पूर्ण करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here