महाराष्ट्र
Ajit Pawar’s public statement – भाजपबरोबर सत्तेत असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्षच
राज्यात विकासाचा मुद्दा घेऊन आपला पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी असला तरी आपण धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जात आहोत. काही मंडळी जनतेची दिशाभूल करतात. पण कोणत्याही धर्म, जात, पंथाबद्दल आकस न ठेवता गोरगरीब शेतकरी व जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.