Home मनोरंजन Sony एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत उग्र स्वभावाच्या...

Sony एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत उग्र स्वभावाच्या कोयलची भूमिका साकारणार अनुष्का मर्चंडे

0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 27 मे पासून रात्री 8:30 वाजता सुरू होत असलेली ‘पुकार – दिल से दिल तक’ ही मालिका म्हणजे दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक कहाणी आहे. जयपूर शहराच्या पार्श्वभूमीवर बेटलेल्या या कहाणीत एक आई आणि तिच्या दोन मुलींची ही गोष्ट आहे, ज्यांना एका दुष्ट योजनेने एकमेकींपासून दूर करण्यात आले आहे. पण, नशीब सरस्वती, वेदिका आणि कोयल या तिघींना नकळत, अनपेक्षित परिस्थितीत पुन्हा एकत्र घेऊन येते. त्यांच्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या शक्तीविरुद्ध त्या तिघींना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे.

अनुष्का मर्चंडे या गुणी अभिनेत्रीला कोयलच्या भूमिकेसाठी घेण्यात आले आहे. कोयल एक महत्त्वाकांक्षी, धाडसी आणि खटपटी मुलगी आहे. एका दुर्दैवी अपघातात ती आपली जन्मदात्री आई आणि बहिणीपासून दुरावली आहे. कोयल आपल्या भूतकाळाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ आहे. मयूरी नावाच्या एका गुंड स्त्रीने तिचा सांभाळ केला आहे.

ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना अनुष्का मर्चंडे म्हणाली, “एका दुष्ट शत्रूने वाताहत केलेल्या एका कुटुंबाची ही आर्त पुकार (साद) आहे, पुन्हा एकत्र येण्याची धडपड आहे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एकमएकींना शोधण्याचा हा प्रयत्न आहे. मी यापूर्वी केलेल्या भूमिकांपेक्षा कोयलची व्यक्तिरेखा फारच वेगळी आहे. प्रेक्षकांनी मला आजवर आपल्या परिचयातल्या एका साध्या-सरळ मुलीच्या रूपात मला पाहिले आहे, पण यावेळी कोयलच्या रूपात त्यांना एक धाडसी, उग्र आणि कणखर मुलगी भेटणार आहे. माझ्यासाठी हे एक मोठे आव्हानच आहे, पण या गुंड स्त्रीची भूमिका करण्यास मी उत्सुक आहे. गुंडांचे व्यवहार कसे असतात हे जाणून घेण्यासाठी मी काही चित्रपट आणि वेबसिरिज यांच्यातून प्रेरणा मिळवली आहे. या मालिकेतला माझा लुक देखील एकदम चमकदार असणार आहे. आणि ही मालिका जयपूरच्या बाहेर घडत असल्याने, लोक मला अनेक प्रकारच्या फ्यूजन पोशाखात बघतील. जसे की, फ्रिल्स आणि भारतीय अॅक्सेसरीज सोबत राजस्थानी डिझाईनचे प्रिंटेड जॅकेट. कोयल माझ्यापेक्षा अगदी वेगळी आहे, कारण मी स्वतः अंतर्मुख आहे, पण कोयल खूप उत्साही आणि जुगाडू आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना माझा हा नवीन अवतार आवडेल.”

‘पुकार – दिल से दिल तक’ सुरू होत आहे 27 मे रोजी रात्री 8:30 वाजल्यापासून, दर सोमवार ते शुक्रवार फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here