Assembly Election 2024: फडणवीस यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? कॅांग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा उपरोधक सवाल !
Maharashtra :- ना मै खाउंगा ना किसीको खाने दूंगा अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान मोदीजींच्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना पकडण्याची बातमी ऐकताच फडणवीस यांनी “ लाडका विनोद “ अशी काही योजना सुरू केली आहे का अशी खोचक प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली आहे. १९८७ साली स्व. बाळासाहेब ठाकरे व रमेश प्रभू यांना धर्माचा प्रचारात वापर केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षाकरीता काढून घेतला होता. तसा तावडे यांचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरणही वॅाशींग मशीनमधे घालून क्लिन चिट देणार? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. स्व. अ. बि. बाजपेयी, शा. प्र. मूखर्जी , दि.द. उपाध्याय यांची परंपरा असलेल्या भाजप ला सध्याच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी “चिक्की पासून नाचक्की “ ची सुरवात करत कुठे नेवून ठेवला आहे हा भाजप असे आता त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत.