Sangola Assembly- सांगोल्यात शहाजीबापूंपुढे शेकापच्या अस्तित्वाची लढाई
सांगोल्यात देशमुख आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यातील लढती आजवर अनेकदा रंगल्या आहेत. गेल्या निवडणुकीपासून प्रत्यक्ष देशमुख हे निवडणूक रिंगणात नसले, तरी चे देशमुख घराणे आणि शहाजीबापू यांच्यातच सामना रंगत आहे. याही वर्षी अशीच लढाई होणार असे निश्चित मानले जाते.
2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत बंड झाले. यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू अग्रस्थानी होते. त्यांचे काय झाडी…काय डोंगर… हे माणदेशी शैलीतील वाक्य त्यावेळी राज्यभर गाजले. सत्ता मिळाल्यानंतर शहाजीबापू यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीने सांगोल्यातील पाणीप्रश्न मार्गी लावला. सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. सांगोल्याच्या दुष्काळी गावांना भाजप सरकारने पाणी दिले. उपसा सिंचन योजना सुरू केल्या. पाणी आल्याने शेतीचे चित्रही बदलले आहे. त्याचा फायदा शहाजीबापूंना मिळू शकतो.
शहाजीबापूंचे पारडे जड असले तरी शेकापची क्षीण झालेली ताकद वाढवत बालेकिल्ला राखण्याचे आव्हान देशमुख कुटुंबीयांपुढे आहे.