पुणे

Chandrakantdada Patil: कोथरुड मतदारसंघात चंद्रकांतदादा पाटील यांनी १ लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले

कोथरुड मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निवडणूक लढवत होते. यानिवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी १ लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून दादांना २५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. पण या निवडणुकीत सर्व कसर भरुन काढत १ लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. त्यामुळे २५ हजारापासून ते एक लाखापासूनचा प्रवास अतिशय खडतर आणि कठोर परिश्रम युक्त म्हणावा लागेल.

Pune, Kothrud :- नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. पुणे शहरातील आठ पैकी सात जागांवर महायुती विजयी झाली. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून होते तो म्हणजे कोथरुड मतदारसंघ. या मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निवडणूक लढवत होते. यानिवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी १ लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून चंद्रकांतदादांना २५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. पण या निवडणुकीत सर्व कसर भरुन काढत १ लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. त्यामुळे २५ हजारापासून ते एक लाखापासूनचा प्रवास अतिशय खडतर आणि कठोर परिश्रम युक्त म्हणावा लागेल.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रकांतदादा पाटील यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यानंतर, दादांनी सर्वस्व पणाला लावून काम केले. त्यावेळी मतदारसंघ नवीन असल्याने, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद प्रस्थापित करुन मतदारांपर्यंत पोहोचणं आणि जुन्यांना सोबत घेऊन काम करणं अशी अनेक आव्हाने दादांसमोर होती. पण ही सर्व अडथळ्यांची मालिका पार करत चंद्रकांतदादा पाटील यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणला. या निवडणुकीत घरचा विरुद्ध बाहेरचा असा अपप्रचार देखील झाला. त्यामुळे त्याचा मतदारांवर देखील विपरित परिणाम झाला. अनेक प्रभागात मतदानाचा टक्का रोढावला. या निवडणुकीत एकूण मतदारांच्या तुलनेत ४८.०२ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख पाच हजार २४६ (५२.९३ टक्के) मतदान झाले. तर विरोधी उमेदवार असलेल्या किशोर शिंदे यांना ७९ हजार ७५१ (४०.८७ टक्के) मतदान झाले होते. तर नोटाला २.०६ टक्के मतदान झाले होते.
यंदा २०२४ च्या निवडणुकीचा विचार केला, तर एकूण ५२.१८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख ५९ हजार २३४ (६८.४ टक्के), चंद्रकांत मोकाटे यांना ४७ हजार १९३ (२०.२७ टक्के), आणि किशोर शिंदे यांना केवळ १८ हजार १०५ (७.७८ टक्के) मते मिळाली. तर नोटाला १.३५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना तब्बल एक लाख १२ हजार ४१ मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना १४.४७ टक्के मते जास्त मिळाल्याने हा विजय सहज शक्य झाला. लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून एक लाख पाच हजाराचे मताधिक्य मिळाले होते.
पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले होते. आता एवढे मताधिक्य मिळण्यापाठिमागे गेल्या पाच वर्षातील चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत कारणीभूत ठरली. कारण गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ २५ हजाराचे मताधिक्य मिळाल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने सेवा कार्य आणि विकासकामे केली, त्यामुळे कोथरुडमधील जनतेच्या मनात कामाचा माणूस अशीच प्रतिमा तयार झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोविडची प्रचंड लाट संपूर्ण जगात आली. याकाळात सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण होते. अनेकांचा हातातील रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच, धान्य पुरवठा करणे, कोविड बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणे, कोविडची कमी लक्षणे असणाऱ्य रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे उपलब्ध करुन देणे, महापालिकेच्या कोविड सेंटरसाठी दीड कोटीचा निधी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिला.
कोविडची लाट ओसरल्यानंतर ही हे सेवा कार्य असेच सुरु ठेवले. यामध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विवाह इच्छुक मुलींना ‘झाल’ उपलब्ध करुन देणे, त्याशिवाय गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसह रुग्णालयात उपचारासाठी लोकसहभागातून खर्च देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया सारखा उपक्रम, किंवा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी महा ई-सेवा केंद्र कार्यन्वित करुन नागरिकांची सोय करणे, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ देणे, बालगोपाळांमध्ये साघिंक भावना वाढीस लागावे यासाठी किल्ले बनवा स्पर्धा, नवोदित कलाकारांसाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोथरुडमधील प्रत्येक कुटुंबाशी एक नाते तयार केले.

याशिवाय मतदारसंघात ही विविध विकास कामांचा डोंगर उभा करुन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या. यात प्रामुख्याने डीम्ड कन्वेयन्स सारखे विषय असोत, किंवा रिडेव्हलपमेंटसाठी सोसायटीतील नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध भागातील प्रलंबित रस्त्यांचे विषय मार्गी लावणे, बाणेर बालेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन, बाणेर-बालेवाडी-सुतारवाडी भागातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी उपकेंद्रास जागा उपलब्ध करुन देणे, सुतारवाडीतील स्माशानभूमीतील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेणे, असे एक ना अनेक विषय सोडविल्यामुळे कोथरुड करांच्या मनात दादांनी घर केले. याशिवाय पुणे महापालिकेने रद्द केलेली ४० टक्के करसवलत पुन्हा लागू करुन घेतल्यामुळे केवळ कोथरुडच नव्हे; संपूर्ण पुण्यातील जनता चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड समाधानी होती. याचाच प्रत्यय निवडणुकीत देखील आला.

निवडणूक प्रचारादरम्यान कोथरुड मधील अनेक नागरिक चंद्रकांतदादा पाटील यांच्या बद्दल भरभरुन बोलत होते. त्यामुळे दादा पुन्हा आमदार होणार यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पत्रकार देखील चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्य किती असेल, याचीच चर्चा करत होते. त्यामुळे निवडणूक निकाला दिवशी देखील त्याचा प्रत्यय सर्वांना आला. मतमोजणी सुरु झाल्यापासून प्रत्येक क्षणाला दादांचे मताधिक्य वाढतच होते. असा एक ही प्रभाग नव्हता, जिथे दादांना मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे दादा म्हणजे कोथरुड आणि कोथरुड म्हणजेच दादा असं काहीसं समीकरण तयार करण्यात गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांना यश मिळालेलं आहे. आता चंद्रकांतदादा पाटील यांचा हा पॅटर्न महाराष्ट्र भाजपाने संपूर्ण राज्यात राबविला, तर संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचा बालेकिल्ला होईल, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button