पुणे

Chandrakantdada Patil: प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!

पुणेकरांना सुसज्ज आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनीही खूप प्रयत्न केले आहेत. पुण्याच्या प्रगतीचा हा प्रवास त्यांच्याशिवाय अपूर्णच राहिला असता, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

Pune :- काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुण्याने देशाच्या नकाशावर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, कारखानदारी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट, आणि वाढते शहरीकरण यामुळे लाखो लोक पुण्यात स्थायिक होत आहेत. मात्र, या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची ये-जा सुकर करण्यासाठी पुण्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत.

ही समस्या ओळखून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने पुण्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलले – मेट्रो प्रकल्पाला गती दिली.

प्रदूषण आणि वाहतूक कोंडीपासून पुणेकरांना मुक्त करण्यासाठी मेट्रो एक उत्कृष्ट पर्याय ठरला. आज मेट्रो पिंपरी-चिंचवडपर्यंत पोहोचली आहे आणि तिचा विस्तारही अधिक वेगाने सुरू आहे.

पंतप्रधान मोदीजींच्या हस्तेच पुणे मेट्रोच्या विविध टप्प्यांचे लोकार्पण झाले असून, हा प्रकल्प शहराच्या प्रगतीचे प्रतीक ठरला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रोला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने तिची लोकप्रियता अधोरेखित केली आहे.

पुणेकरांना सुसज्ज आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनीही खूप प्रयत्न केले आहेत. पुण्याच्या प्रगतीचा हा प्रवास त्यांच्याशिवाय अपूर्णच राहिला असता, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
मेट्रोच्या विस्तारासाठी पुणेकरांचे विशेष अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button