Chandrakantdada Patil: वाढत्या नागरिकरणामुळे निर्माण झालेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न केला मार्गस्थ…
चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मे २०२३ मध्ये पाण्याच्या टाकीचे काम पूर्णत्वास नेऊन पाण्याची समस्या मिटवली. त्यामुळे पाण्यासाठी त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
Pune :- वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरात उंचच उंच इमारती उभ्या राहतात. पण या इमारतीत राहणाऱ्यांना हळू-हळू कमी पडू लागतं जीवन, म्हणजेच पाणी… पुण्यातही अनेक ठिकाणी तसेच झाले. रोजगाराच्या संधींमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येऊ लागले, स्थिरावू लागले. पण पाणी तितकेच राहिले. आणि वाढत्या उपनगरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली.
अन्य उपनगरांप्रमाणे कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी हा भागही झपाट्याने विकसित झाला. पण या भागातही समस्या सतावू लागली, मुबलक पाण्याची. वाढत्या वस्तीमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला होता. रहिवासी त्रस्त झाले होते. महानगरपालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत या भागासाठी टाकी मंजूर झाली होती, पण काम पुढे सरकत नव्हते. त्यामुळेच बाणेर बालेवाडी भागातील रहिवासी आणखी अडचणीत आले होते.
हा विषय चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या कामाला गती दिली. विकासकामात लोकसहभाग असावा. हा दादांचा कटाक्ष असतो. लोकसहभागातूनच त्यांनी १८ कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले. २०२३च्या मे महिन्यात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले