Chandrakantdada Patil: संकल्प… ६५ हजार वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा!
65 व्या वाढदिवसानिमित्त 65 हजार झाडे ! चंद्रकांतदादा पाटील यांचा हरित महाराष्ट्र संकल्प, 65 हजार झाडे लावली, जगवलीही
Pune :- आपल्या आयुष्यात काही दिवस महत्त्वाचे असतात, पण काही दिवस विशेष जिव्हाळ्याचे आणि स्पेशल असतात. त्यातलाच एक म्हणजे वाढदिवस. प्रत्येक वाढदिवस आपण आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतो, काही विशेष संकल्प करतो, स्वतःसाठी आनंदाचे क्षण जपतो. पण कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे लाडके नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी १० जूनला होणारा त्यांचा वाढदिवस विशेष आणि अर्थपूर्ण करण्यासाठी एक वेगळाच संकल्प केला…
हा संकल्प होता ६५ हजार वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा!
चंद्रकांतदादांनी कोणताही डामडौल न करता वाढदिवस साधेपणाने, पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देऊन साजरा करून समाजालाच एक आगळीवेगळी भेट देण्याचा निश्चय केला. ६५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ६५ हजार झाडं लावण्याचा संकल्प करून त्यांनी समाजापुढे जणू एक आदर्शच ठेवला आहे.
या संकल्पाची सुरूवात ९ जून २०२४ रोजी कोथरूडच्या विविध भागांमध्ये स्वतः वृक्षारोपण करून चंद्रकांतदादांनी केली.आजच्या जगात बेसुमार जंगलतोड ही चिंतेची बाब आहे. वाढते तापमान आणि कमी होत चाललेल हरितपट्टे पर्यावरणावरही दुष्परिणाम करत आहेत. “जंगलं म्हणजे निसर्गाची फुफ्फुसे,” हे खरेच आहे. पर्यावरणाचं महत्त्व जाणून घेत, कोथरूडमधील हरित क्षेत्र टिकवण्याबरोबरच त्यात भर घालण्यासाठी चंद्रकांतदादांनी केलेला वृक्षारोपणाचा संकल्प म्हणूनच महत्त्वाचा आहे.
‘हरित कोथरूड’ हा केवळ विचार नसून, भावी पिढीला एक समृद्ध, हिरवाईने नटलेला परिसर देण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांतदादांच्या या संकल्पामुळे कोथरूडकरांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती वाढली आहे. विशेषतः महात्मा टेकडी, म्हातोबा टेकडी, तुकाई टेकडी आणि परिसरात या झाडांची लागवड झाल्याने परिसराचा हिरवाईचा परीघ विस्तारणार आहे. उद्या जेव्हा या रोपांची झाडे होऊन विशाल वृक्ष होतील, तेव्हा कोथरूडचं रूप अजूनच खुलून दिसेल.
“वाढदिवशी एक तरी झाड लावावं” असं म्हटलं जातं.
चंद्रकांतदादांनी निसर्गसृष्टीत तब्बल ६.५ हजार झाडांची भर घालून कोथरूडकरांना हिरवाईची भेट दिली आहे.
ही भेट भविष्यकाळातही आनंद देणारी आहे. या संकल्पाला साथ देऊन, माझ्यासोबत कोथरूडकरांनीही
या वृक्षांना जपण्यासाठी, वाढवण्यासाठी एकत्र यावं, असं ते सांगतात.
वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेली ही हरित चळवळ चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाची निसर्गाप्रती असलेली तळमळ
आणि भावी पिढ्यांसाठी त्यांनी दिलेली अमूल्य भेटच आहे. कोथरूडकरांना कदाचित यापेक्षा बहुमोल भेट मिळूच शकणार नाही.