महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule – विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड

संस्थेस कामयस्वरुपी जमिनीची गरज नाही, असा अभिप्राय वित्त विभागाने दिला असून, विरोध फेटाळून मंत्रिमंडळ बैठकीत ही जमीन रेडीरेकनर दरासुसार थेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी’ या संस्थेतर्फे महादुला कोराडी येथे सेवानंद विद्यालय चालविले जात असून संस्थेला आता कनिष्ठ महाविद्यालय, विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय तसेच कौशल्य विकास केंद्रांतर्गत तंत्रशिक्षण आणि नर्सिंग महाविद्यालयही सुरू करायचे आहे. त्यासाठी इमारत, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान, व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी ५.०४ हेक्टर आर एवढी शासकीय जमिनीची मागणी सरकारकडे केली होती. या जमीनीची शासकीय मुल्यानुसार किंमत चार कोटी ८६ लाख असून शासनच्या धोरणानुसार शैक्षणिक प्रयोजनासाठी सवलतीमध्ये थेट द्यावी अशी मागणी संस्थेने केली होती.

दरम्यान, ही संस्था उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून येत नाही’, असे नमुद करीत या संस्थेस थेट आणि सवलतीच्या दरात जमीन देण्यास महसूल तसेच वित्त विभागाने तीव्र विरोध केला. तसेच ही जमीन थेट न देता शासकीय जमीन वाटप धोरणानुसार द्यावी अशी भूमिका महसूल विभागाने घेतली होती. तर या संस्थेला शिक्षण क्षेत्रात काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव किंवा विशेष उल्लेखनीय कार्य केल्याचा तपशील दिसून येत नाही असे नमुद करीत वित्त विभागाने या प्रस्तावास नकार दिला होता.

असे असताना देखील ही जमीन या संस्थेला कशी काय मिळाली?हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या संस्थेचे अध्यक्ष असल्या कारणाने या संस्थेला ही जमीन एवढ्या सहजरीत्या मिळाली का?असा प्रश्न देखील नागरिक विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button