CM Eknath Shinde – पुण्याचा होणार आता वर्तुळाकार विकास
PUNE :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या या अंदाजपत्रकाला पीएमआरडीएचे अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंजुरी दिली. या अंदाजपत्रकामध्ये बांधकाम विकास शुल्कातून जवळपास एक हजार कोटींचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले असून, अंदाजपत्रक मंजूर झाल्याने वर्तुळाकार रस्त्यासह अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे आणि भूसंपादन वेगाने होण्याची शक्यता आहे.
अंदाजपत्रकामध्ये सर्वाधिक उत्पन्न विकास परवानगी शुल्कातून गृहीत धरण्यात आले आहे. त्या पाठोपाठ जमीन आणि मालमत्ता विभागा, लेखा आणि वित्त विभागाकडून उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून, अन्य विभागांतून १८९ कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विकास परवानगी विभागातून १०९९.५९ कोटी, तर जमीन आणि मालमत्ता विभागातून २०००.६७ कोटींचे उत्पन्न मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कायमस्वरूपी कर्मचारी आस्थापना, कंत्राटी कर्मचारी मानधन, सेवा सल्लागार आणि प्रशासकीय कामकाजावरील खर्च महसुली खर्चात धरण्यात आला आहे.
भांडवली खर्चात अभियांत्रिकी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, लोणावळा स्काय वॉक, वन विभागातील प्रकल्प विकासावरील खर्च गृहीत धरण्यात आला आहे.
तसेच, भांडवली खर्चात अभियांत्रिकी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, लोणावळा स्काय वॉक, वन विभागातील प्रकल्प विकासावरील खर्च गृहीत धरण्यात आला आहे.