CM Eknath Shinde – विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार
कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
MUMBAI :- राज्य शासनामार्फत समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी योजना राबविल्या जात आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना राबविल्या जात असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तत्पूर्वी बंटर भवन कुर्ला येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र उद्योग तसेच परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात महिलांबरोबरच शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी देखील विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.