Dr. Vijayakumar Gavit – ‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे
NANDURBAR :- आजपासून (15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत) चालू राहणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या जन आंदोलनासाठी सर्वांनी पूर्ण, निष्ठापूर्वक समर्पण करण्याची शपथ, आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या वतीने शिवण नदी पात्रात आयोजित ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’च्या शुभारंभ प्रसंगी शपथ देताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले, प्रत्येकाने अंतकरणातून हा दृढ संकल्प करून, स्वतःला एक स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छता ही सेवा’ या जन आंदोलनासाठी सर्वांनी पूर्ण, निष्ठापूर्वक समर्पण करावे. यात प्रत्येकाने आपले घर, विद्यालय, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे आणि बस स्टेशन, तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच स्वतः शिवाय इतर लोकांना, जे स्वतःची स्वच्छता संबंधित व्यवस्था करण्यात असमर्थ आहेत त्यांना दोन खड्डयाच्या शौचालयाच्या निर्मितीसाठी मदत करून गाव, वाडया, वस्ती यांना हागणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यायला हवे. शौचालयाचा वापर, हात धुण्याची सवय आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयींमध्ये वर्तनबदल करण्यात सहभागी व्हावे. सांडपाणी आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कमी करणे, पुनर्रप्रक्रिया आणि पुनर्रउपयोग या सिद्धांताचा स्वतः अंगीकार करून इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
यावेळी शिवण नदी पात्रात गणपती विसर्जनामुळे झालेल्या निर्माल्याची स्वच्छता करण्यात आली यात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार विविध यंत्रणांचे प्रमुख,अधिकारी व पदाधिकारी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला.