Home शिवसेना (SS) Eknath Shinde – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे...

Eknath Shinde – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी चेंबूर येथील घाटला गाव आणि धारावी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविराट जनसभांना संबोधित केले.

0

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आज चेंबूर येथील घाटला गाव आणि धारावी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविराट जनसभांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी त्यांनी बोलताना, निवडणूक जवळ आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले असा सवाल यासमयी उपस्थित केला. जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही असे यावेळी शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या सरकारने दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे सुशोभिकरण होते आहे, आपला दवाखाना सुरु आहे, जागतिक दर्जाचे शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईकर जो बाहेर फेकला आहे, त्याला परत मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करत असल्याचे याप्रसंगी नमूद केले.

राहुल शेवाळे यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, अशी ग्वाही दिली. धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला त्याचे हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे यावेळी सांगितले.

२०१४ पूर्वी या शहरातही वारंवार बॉम्बस्फोट व्हायचे. मात्र त्यानंतर एकदाही बॉम्बस्फोट झाला नाही. कारण या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मजबूत नेतृत्व लाभले आहे. मजबूत सरकारसाठी येत्या २० मेला धनुष्यबाणातून असा मतांचा वर्षाव करा, की मशाल विझली पाहिजे आणि धनुष्यबाण व राहूल शेवाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेच पाहिजेत असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार कृपाल तुमाने, खासदार अशोक चव्हाण, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार तुकाराम काते, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, मनसे नेते संदीप देशपांडे, अभिनेते दिगंबर नाईक, विभागप्रमुख अविनाश राणे, महिला विभाग प्रमुख सुनीता वैती तसेच चेंबूर आणि धारावी परिसरातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here