Indurikar Maharaj’s warning – “धर्माचं भांडवल करु नका, राजकारणाच्या दंगलीत गरीबांच्या पोरांचे बळी जातात”
महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरिकर महाराज आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेले वक्तव्य चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. धर्माचं भांडवल करू नका, अस म्हणत त्यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.
“तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही या दंगली बिंगलींमध्ये पडू नका. मी अनुभवांवरुन सांगतो आहे. माझी वाक्यं फक्त पुस्तकांतली नाहीत, तर अनुभवांमधून आलेली आहेत. लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत. जर दंगली बिंगलीत दिसले तर दहा वर्षे शिक्षा आहे. आत्तापर्यंत गरीबांचीच लेकरं आत गेली आहेत. मोठ्यांचे कधीही आत गेले नाहीत आणि जाणार नाहीत. हे मी तुम्हाला तळतळीने सांगतो आहे.”
धर्माचा अभिमान नाही का? असं कुणी तुम्हाला विचारल तर त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. सगळे पोलीस तुम्हाला सांगतील. आज एकही काम पोलीस व्हेरीफिकेशन शिवाय होत नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे दंगलीत पडू नका.”
जर पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम झालाच म्हणून समजा. चारित्र्याचा दाखला देण्याचं काम पोलीस करत असतात. आम्ही काहीही केलं नाही, बँक लुटली नाही, गुन्हा काही केला नाही तरीही रोज नवं लफडं आहे माझ्याभोवती. गुन्हा एकच आहे ते म्हणजे मी खरं बोलतो. तुम्ही दंगली बिंगलीत पडू नका. तुम्ही गरीब राहा, घरी घरी कुल्फी विका, अजून काही विका पण या असल्या गोष्टींमध्ये पडू नका. ४० टक्के पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत. आज पैसा कमावणंही पाप झालं. आपण कापूस ५०० क्विंटल विकला दोन कोटी आले तर लगेच दोन कोटी कुठून आले? याची चौकशी होते. आता काय करायचं बोला? फेअर अँड लव्हली लावून जर माणसं गोरी झाली असती मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? समाज मारायचा आहे विचार करु द्यायचा नाही अशा गोष्टी चालली आहे. ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला ते नोकरी देऊ म्हणतात. युज अँड थ्रो सारखं ज्यांनी पोरांना वापरलं आहे. मी मेल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो आहे त्याची आठवण येईल. पण फरक काही पडणार नाही. असाही टोला देखील इंदुरीकर महाराजांनी तरुणांना संदेश देताना लगावला आहे.