पुणे

Maharashtra Teachers – प्राथमिक शिक्षकांचे आज सामूहिक रजा आंदोलन

PUNE :- कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील शिक्षकांचा आक्रोश आता उफाळून आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शालेय शिक्षणावर विपरित परिणाम होणार असल्याची शिक्षक संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. त्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सअॅप समूह सोडणे, काळी फीत लावून काम करणे अशाप्रकारे विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर आता आज रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कमी पटाच्या शाळांवर तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती, पुढे त्या शिक्षकालाही काढून टाकल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार आहे. शाळा सुरू होऊन तीन महिन्यांनंतरही कित्येक विद्यार्थी गणवेशाविना आहेत. तर,मिळालेले गणवेश विद्यार्थ्यांच्या मापाचे नाहीत, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाके नाहीत, काही ठिकाणी पुस्तकेही पोहोचलेली नाहीत, शाळांच्या इमारतीची दुरवस्था आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button