Mahayuti Govt – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
१५ हजार कोटी खर्चाच्या ३० कामांना मंजुरी
महिला, शेतकरी, युवकांसाठी विविध योजना जाहीर केल्यावर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाज घटकांना खुश करण्यावर महायुती सरकारने भर दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले.
विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. कदाचित हरियाणा आणि जम्मू व काश्मीरचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर झाल्यावर लगेचच आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळेच महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे असे म्हटले जाते.
ब्राह्मण आणि राजपूत समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचसोबत, सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट, गायीच्या दुधासाठी लिटरमागील अनुदान पाच रुपर्यावरून सात रुपयांपर्यंत वाढ. एस. टी. महामंडळाच्या ३९ स्थानकांचा खासगीकरणातून विकास. ठाणे, पनवेल, मुंबई, पुण्यातील एस. टी. स्थानकांच्या जागा पहिल्या टप्प्यात विकसित करण्याची योजना आदी निर्णय यावेळी घेण्यात आले आहेत.