पुणे

Manish Anand: झोपडपट्यांच्या नियोजित पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देणार

मनिष आनंद यांच्या पदयात्रेला औंधगाव, बोपोडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune :- छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी 11 नोव्हेंबर रोजी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत (औंध) येथे तर आज (दि. 12 ) सकाळी बोपोडीत मानाजी बाग ते छाजेड पेट्रोल पंप या भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली, या दोन्ही पदयात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इंदिरा आणि कस्तुरबा वसाहत हा बहुतांश झोपडपट्टी असलेला परिसर आहे, यामुळे या भागातील नागरिक अपुऱ्या पायाभूत सुविधांपासून गरीब राहणीमानापर्यंत अनेक नागरी आव्हानांना तोंड देत आहे. या समस्यांकडे लक्ष वेधताना, मनिष आनंद यांनी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा आणि शहरी राहणीमानाची एकूण गुणवत्ता वाढवणारा उपाय म्हणून नियोजित पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देऊन काम करणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना आनंद म्हणाले कि, चांगल्या प्रकारे अंमलात आणलेली पुनर्विकास योजना केवळ स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वीज यासारख्या नागरी समस्यांचे निराकरण करणार नाही तर रहिवाशांना चांगले घर आणि अधिक स्थिर वातावरण प्रदान करेल. पुनर्विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करणे नव्हे; हे आपल्या लोकांसाठी एक चांगले भविष्य निर्माण करण्याबद्दल आहे,

बोपोडी येथे बोलताना वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यावर,मूलभूत सुविधा वाढविण्यावर आपला भर असेल असे आनंद यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button