महाराष्ट्रमुंबई

MPCC Chief Says …तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर

MUMBAI :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाविषयी विचारले असता, ते म्हणाले की, नाना पटोले म्हणाले की, मी कधीही खुर्चीची लढाई लढली नाही, कायम जनतेची लढाई लढलीय. त्यामुळे मला फळ काय मिळते यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल. महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल हेच काम मी केले आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरवसा ठेवणारा मी आहे. मला लांगूनचालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो. जिथं मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काम करत असेन तर ती खुर्ची माझ्या कामाची नाही. मी अनेक खुर्चा सोडलेला माणूस आहे. खुर्चीची लढाई कधीच लढलो नाही. कर्मावर विश्वास आहे. मी माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे. ते मला सांगायचे, वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे. आज त्याची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा देतील हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे जनतेचा कौल आणि उद्याच्या नेतृत्वाचा निर्णय त्याचे आम्ही स्वागत करतो असं त्यांनी म्हटलं.

तसेच मुख्यमंत्रिपद हा निवडणुकीनंतरचा भाग आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला बाहेर काढणं हे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाविषयी विचारले असता, ते म्हणाले की, नाना पटोले म्हणाले की, मी कधीही खुर्चीची लढाई लढली नाही, कायम जनतेची लढाई लढलीय. त्यामुळे मला फळ काय मिळते यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल. महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल हेच काम मी केले आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरवसा ठेवणारा मी आहे. मला लांगूनचालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो. जिथं मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काम करत असेन तर ती खुर्ची माझ्या कामाची नाही. मी अनेक खुर्चा सोडलेला माणूस आहे. खुर्चीची लढाई कधीच लढलो नाही. कर्मावर विश्वास आहे. मी माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे. ते मला सांगायचे, वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे. आज त्याची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा देतील हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे जनतेचा कौल आणि उद्याच्या नेतृत्वाचा निर्णय त्याचे आम्ही स्वागत करतो असं त्यांनी म्हटलं.

तसेच मुख्यमंत्रिपद हा निवडणुकीनंतरचा भाग आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला बाहेर काढणं हे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button