महाराष्ट्र शासन

PM Vishwakarma Yojana – थीम पॅव्हेलियनमध्ये प्रधानमंत्र्याचा लाभार्थ्यांशी संवाद

पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींचे प्रदर्शन २१ आणि २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

WARDHA :- पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या आकर्षक कलाकृतींची पाहणी करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारागिरांचे कौतुक केले.

प्रदर्शनीमध्ये या कलाकृतींचा समावेश : उत्तराखंड राज्यातील जैंबुन निशा (गारलँड मेकर), बिहार येथील सिंटू कुमार ( डॉल व टॉय मेकर), नागालँड येथील अखिरिली किरहा (सुतार), मध्यप्रदेश येथील रामनाथसिंग गुजर (मूर्तीकार), केरळ राज्यातून सतीष के.सी. (सोनार), ओडिशा येथील सुदिप्ता दास (मत्सजाळे कारागीर), झारखंड येथील गोपाल माडीया (लोहार), आंध्रप्रदेश येथील एम. हरीक्रिष्णा (न्हावी), छत्तीसगड येथील कांतीबाई साहू (बास्केट मेकर), आसाम येथील उपेंद्रा बरुहा (राजमिस्त्री), तेलंगणा येथील महाराजू लक्ष्मी (धोबी), पंजाब येथील कमल कुमार (मोची), उत्तरप्रदेश येथील राजाराम (कुंभार), जम्मू आणि कश्मीर येथील अब्दूल माजीद भट (बोट मेकर), महाराष्ट्रातील कीर्ति संतोषराव रावेकर (टेलर्स), कर्नाटक येथील शेखरप्पा कम्म (अस्त्रकार), राजस्थान येथील भोला लौहार (हातोडा व टुल किट मेकर) आणि गुजरात राज्यातील कमलेशभाई परमार (कुलूप निर्मितीकार) यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button