Pune Congress – भाजपचा तरविंदर सिंग मारवा याच्यावर गुन्हे दाखल करा पुणे शहर काँग्रेसची मागणी!
PUNE :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकतीच दिल्ली भाजपचा तरविंदर सिंग मारवा याने जीवे मारण्याची धमकी दिली होती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला जर अशा धमक्या सामान्य कार्यकर्ता देऊ लागले तर भाजपच्या या राज्यात सामान्य नागरिकांचे काय होईल हाल होत असतील हे आपणास दिसून येते.
आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने सदर मारवा वर याआगोदर गांधी फॅमिली वर झालेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्याच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एडवोकेट अभयजी छाजेड, माजी महापौर सौ. कमलताई व्यवहारे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ.संगीता ताई तिवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित अप्पा यादव, नगरसेवक अविनाश साळवे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, प्रभाग अध्यक्ष मुन्ना खंडेलवाल इत्यादी उपस्थित होते.