Home पुणे PUNE – ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीने आणली रंगमंचावर बहार, १०० पेक्षा जास्त वादकांचे...

PUNE – ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीने आणली रंगमंचावर बहार, १०० पेक्षा जास्त वादकांचे रोमांचक लाईव्ह संगीत सादरीकरण

0

पुणे, ६ मे २०२४ : ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीने असामान्य कौशल्य असणाऱ्या शंभरपेक्षा अधिक वादकांना एकत्र आणून एक जोशपूर्ण लाईव्ह कन्सर्ट सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. विमान नगर येथे सिम्बिओसिस ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला ८०० पेक्षा अधिक रसिकांनी सहकुटुंब हजेरी लावली. या रंगमंचाद्वारे  संगीत कौशल्य आणि सामूहिक जोशपूर्ण संगीत मैफिल साजरी करण्यात आली.

अमोल देठे यांच्या नेतृत्वाखाली संगीत मैफिलीत वैविध्यपूर्ण सांगितिक प्रतिभा उलगडत गेल्या आणि श्रोते आपोआप मंत्रमुग्ध होत गेले. विशाल देठे आणि त्यांच्या चमूने अन्य वादकां सोबत ठेक्यावर ताल धरला, शिवाय अन्य सहकाऱ्यांनी कीबोर्डवर सराईतपणे बोटे फिरवत प्रेक्षकांना भारावून टाकले.सर्व उपस्थितांना एक अविस्मरणीय संगीत मैफिलीचा अनुभव आला.

या संगीत मैफली मध्ये विविध वाद्यांचे सादरीकरण झाले. त्यात काळजाला हात घालणारे सॅक्सोफोन वादक, ट्रंपेट, गिटार वादक, व्हायोलिन वादक व अनेक गायकांचा समावेश होता. प्रत्येक कलावंताने आपला स्वतंत्र बाज दाखवून दिला आणि सुमधुर गाणी व ठेका धरायला लावणारा ताल यांची एकत्रित गुंफण केली. ती श्रोत्यांना खूपच भावली.

या अविस्मरणीय संध्याकाळविषयी बोलताना ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीचे सहसंस्थापक अमोल देठे म्हणाले या मैफलीत केवळ सांघिक प्रतिभेचे दर्शन झाले असे नाही तर आमच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या अढळ निष्ठा व असाधारण कौशल्य यांचे प्रमाण म्हणून ती समोर आली. सर्व सीमा ओलांडणाऱ्या आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या हृदयात प्रेरणा जागवणाऱ्या संगीताच्या परिवर्तनकारी शक्तीची एक तीव्र जाणीव म्हणून संगीताचे स्थान आहे.”

ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीच्या कोर टीमच्या निष्ठा आणि अथक मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन झाले आणि कार्यक्रम सुरळीत झाला. उत्कृष्टतेसाठी या गटाची  कटिबद्धता आणि संगीताचा ध्यास यातून दिसून येतो आणि यामुळे ही संध्याकाळ सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली.

या मैफिलीचे सूर रात्रीच्या अंधारात विरत असताना एक प्रभावी सांगितिक समूह निर्माण करून होतकरू संगीतकारांना प्रोत्साहन देण्यास आपली बांधिलकी ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीने दाखवून दिली. ही मैफल अत्यंत यशस्वी झाल्यामुळे संगीत क्षेत्राच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्याला प्रेरणा देण्याची व समृद्ध करण्या च्या या आपल्या ध्येयाला अधिक बळकट करण्याचे अकॅडमीचे लक्ष्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here