Pune Congress: काँग्रेसच्या महिला पुणे शहराध्यक्षपदी संगीता तिवारी
पूजा आनंद यांच्यावर निलंबनाची कारवाई, ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या महिला पुणे शहराध्यक्षपदी संगीता तिवारी
Pune :- काँग्रेसच्या महिला आघाडी शहराध्यक्षपदी संगीता तिवारी यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी तसे पत्रही दिले. आधीच्या शहराध्यक्ष पूजा आनंद यांच्यावर अखेर प्रदेश शाखेने निलंबनाची कारवाई केली आणि संगीता तिवारी यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले.
काँग्रेसच्या पुणे शहर शाखेतील पदाधिकारी त्याबाबत आग्रही होते. प्रदेश समितीला कळवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने ऐन प्रचाराच्या काळात महिला आघाडीला शहराध्यक्षच नाही, अशी काँग्रेसची स्थिती झाली होती. अखेर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पत्रामुळे पूजा आनंद यांच्यावर कारवाई झाली, त्याचबरोबर संगीता तिवारी यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. संगीता तिवारी या प्रदेश महिला शाखेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्या पुणे शहरातील काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्या असून, महापालिका शिक्षण मंडळाच्या काही वर्षांपूर्वी अध्यक्ष होत्या.