Pune Ganapati Immersion – पुण्यात विसर्जनावेळी पार्किंग कुठे, रस्ते कोणते बंद? मिरवणुकीला जाताय? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी…
PUNE :- पुण्यात आता गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यासाठी १७ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणेच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी येत असतात. गर्दी वाढणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे.
मिरवणुकीला जाण्याआधी तुम्ही कोणत्या ठिकाणी वाहने लावू शकतात ती ठिकाणे तुम्ही स्क्रीनवर पाहु शकता…
विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी रोड, टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहतील. शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते देखील वाहतुकीस बंद असतील. पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस बंद असतील ते तुम्ही स्क्रीनवर पाहु शकता…
याचसोबत, पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची माहिती आता एका अॅप द्वारे मिळणार आहे. गणेश विसर्जनादिवशी ‘माय सेफ पुणे’ अॅपद्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलिस मदत केंद्रे, पादचारी मार्ग यांची माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळांच्या मिरवणुकीबाबत सद्यः स्थितीची माहिती दिली जाणार आहे.