Home पुणे PUNE – महिलांसाठी ओएसिस फर्टिलिटी ची ‘मी मनस्वी’ मोहीम

PUNE – महिलांसाठी ओएसिस फर्टिलिटी ची ‘मी मनस्वी’ मोहीम

0

पुणे, ०६ मे २०२४ : राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२४ व ओऍसिस फर्टीलिटीच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त, “#मी मनस्वी”- ओएसिस फर्टिलिटी, पुणे सेन्टर द्वारे फर्टिलिटी उपचार विषयी जनजागृती आणि लग्नानंतर येणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्यचे समाधान आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली.

या उद्घाटन प्रसंगी पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. आरती निमकर, आयएमए पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा डॉ .माया भालेराव, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या सचिव डॉ सारिका लोणकर हे सर्व सन्मानीय अतिथी, तसेच सामाजिक कार्यकत्या श्रीमती नलिनी बलकवडे हे विशेष अतिथी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ नीलेश उन्मेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओऍसिस फर्टीलिटी च्या डॉ भारती खोलापुरे,डॉ सायली चव्हाण, डॉ स्नेहा बल्की , डॉ. अश्विनी वाघ या देखील उपस्थित होत्या.

या प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके हास्य कलाकार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांचा विनोदी प्रहसनानंचा कार्यक्रम घेण्यात आला आणि ५ गरजू विद्यार्थीना “उन्मेष” शिष्यवृती देण्यात आली.

आजच्या युगात स्त्रिया या स्वतःच्या करिअर अणि भविष्या याबद्दल गंभीर असतात. तरीही जेव्हा फर्टीलिटी क्षमतेचा प्रश्न येतो तेव्हा त्या एक दुविधा स्थितीत अडकतात. ओएसिस फर्टिलिटी, पुण्यातील अग्रगण्य फर्टीलिटी चैन आहे जी स्त्रियांसाठी फेर्टीलिटी प्रेझर्व्हशनसाठी उपाय आणि उपचार प्रदान करते. मी मनस्वी” ही मोहीम ओएसिस फर्टिलिटीने महिलांना फर्टीलिटी क्षमतेच्या विविध पर्यायांसह सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे ज्यात फर्टीलिटी जतन करण्याच्या पद्धती जसे की स्त्रीबीज फ्रीझिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे.

स्त्रीबीज फ्रीझिंग ही एक नवीन फर्टीलिटी प्रेझंर्व्हशन पद्धत आहे जी महिलांना भविष्यातील वापरासाठी त्यांची स्रीबीजे गोठवू देते “ओएसिस फर्टिलिटीमध्ये, आमचा असा विश्वास आहे की महिलांनी त्यांच्या फर्टीलिटी आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम असावे आणि कमी वयात स्त्रीबीज फ्रीझिंग केल्याने गर्भधारणा आणि करिअरच्या उद्दिष्टांवर पूर्ण नियंत्रण मिळावे. दुर्दैवाने, फारशा स्त्रियांना फर्टिलिटी प्रेसर्व्हशन करण्याविषयी माहिती नाही, आणि फर्टीलिटी जतन करण्याविषयी जागरूकता ही काळाची गरज आहे”, असे डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे, पुण्यातील ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड,यांनी सांगितलॆ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here