पुणे

Ruby Hall Clinic News: रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे भारतातील पहिल्या अनामया एमआरआय मशीनचे अनावरण

मेक इन इंडिया पुढाकार अंतर्गत अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानात अग्रणी असलेल्या आणि रेफेक्स समूहाचा भाग असलेल्या थ्रीआय मेडटेक कंपनीने विकसित केलेले हे मशीन म्हणजे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तनीय टप्पा आहे. अनामया हे आरोग्याशी निगडीत असून इमेजिंग द पाथ टू वेलनेस या तत्त्वासह विश्वास आणि प्रगतीचे प्रतीक आहे.हे अद्यावत व पथदर्शक एमआरआय मशिन प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानासह अचूक निदान प्रदान करते,त्याचबरोबर जलद स्कॅन,रूग्णांसाठी अधिक सुलभता आणि किफायतशीर प्रक्रिया प्रदान करते.

Pune :- रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे ताजने माळा,नवीन नगर रस्ता,संगमनेर येथील आपल्या सुविधेमध्ये अनामया या भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीचे 1.5 टी एमआरआय मशीन प्रस्थापित करण्यात आले आहे. मेक इन इंडिया पुढाकार अंतर्गत अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानात अग्रणी असलेल्या आणि रेफेक्स समूहाचा भाग असलेल्या थ्रीआय मेडटेक कंपनीने विकसित केलेले हे मशीन म्हणजे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तनीय टप्पा आहे.

आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम येथील मेडटेक झोन (एएमटीझेड) येथे निर्मित केलेले अनामया हे भारतातील अभिनवता व उत्कृष्टतेचा पुरावा आहे.अनामया हे आरोग्याशी निगडीत असून इमेजिंग द पाथ टू वेलनेस या तत्त्वासह विश्वास आणि प्रगतीचे प्रतीक आहे.हे अद्यावत व पथदर्शक एमआरआय मशिन प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानासह अचूक निदान प्रदान करते,त्याचबरोबर जलद स्कॅन,रूग्णांसाठी अधिक सुलभता आणि किफायतशीर प्रक्रिया प्रदान करते.या मशिनचे अनावरण म्हणजे दुर्गम भागांमध्ये जागतिक दर्जाच्या निदान सुविधा प्रदान करण्याचे रूबी मेडिकल सर्व्हिसेसच्या ध्येयाशी सुसंगत आहे.

अनावरणाच्या या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी,कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट व विभागप्रमुख डॉ.प्रणव महादेवकर आणि रूबी हॉल क्लिनिकच्या धोरण व व्यवसाय विकास विभागाच्या सरव्यवस्थापक नताली ग्रांट नंदा यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात दीप प्रज्वलन,अनामया एमआरआय मशिनचे अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर रूबी हॉल क्लिनिकचा आरोग्य सेवा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा वारसा दर्शविणारी कॉर्पोरेट फिल्म प्रदर्शित करण्यात आली.

रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.पी.के.ग्रांट यांनी या महत्त्वाच्या टप्प्याबाबत आपला आनंद व्यक्त केला.ते म्हणाले,मेडिकल इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये पथदर्शक,अभिनव संकल्पना आणि भारतात असेंबल केलेले अनामया 1.5 टेस्ला एमआरआय स्कॅनर आमच्या संगमनेर युनिटमध्ये प्रस्थापित करणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.हे अद्यावत मशिन म्हणजे केवळ प्रगत तंत्रज्ञान नव्हे तर अद्वितीय प्रतिमा गुणवत्ता आणि निदान अचूकता प्रदान करून रेडिओलॉजिस्टच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करते.किफायतशीर दरासह हे मशिन सर्वांसाठी उपलब्ध होऊन आरोग्य सेवा पुरवठादार आणि रूग्णांमधील दरी भरून काढण्यास मदत करेल.आमचे ध्येय हे सहज उपलब्ध असलेले किफायतशीर,विश्वसनीय आणि जागतिक दर्जाच्या मेडिकल इमेजिंग सोल्युशन्स प्रदान करणे हे आहे.भारतातील आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बनणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

महाजन इमेजिंगचे संस्थापक अध्यक्ष व आयआरआयएचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.हर्ष महाजन यांनी रूबी मेडिकल सर्व्हिसेस आणि थ्री आय मेडटेकच्या प्रयत्नांचे कौतुक केले.ते म्हणाले की,अनामया एमआरआय मशिनसाठीचे सहकार्य हे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील नवा अध्याय आहे.केवळ अद्ययावतच नव्हे तर किफायतशीर आणि सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल,अशा तंत्रज्ञानाची निर्मिती भारत करू शकतो हे यातून दिसून येते.हा पुढाकार आरोग्य सेवेमधील भविष्यातील अभिनव कल्पनांसाठी एक प्रारूप ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button