महाराष्ट्र

Thane and Konkan Legislative Assembly – लोकसभेत महायुतीला हात देणारा ठाणे आणि कोकण पट्टा विधानसभेलाही त्यांच्या सोबत राहणार का?

ठाणे आणि कोकण पट्टा विधानसभेलाही सत्ताधारी आघाडीसाठी महत्त्वाचा प्रदेश ठरणार आहे.

ठाणे आणि कोकण पट्टा विधानसभेलाही सत्ताधारी आघाडीसाठी महत्त्वाचा प्रदेश ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यासह कोकणमधील पाच लोकसभा जागा महायुतीचे बळ वाढवणाऱ्या ठरल्या. हेच बळ विधानसभेलाही कायम राखण्यासाठी महायुतीला प्रयत्न करावे लागणार आहेत.

रत्नागिरीमधील पाच तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अशा एकूण जागांपैकी २०१९ मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकल्या होत्या. आता राज्यातील समीकरणे बदलल्यावर जिल्ह्यावर त्याचा परिणाम झाल्याचे लोकसभा निकालातून दिसून आले. मुंबईतील राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब या दोन जिल्ह्यांमध्ये उमटते. मुंबईत शिवसेनेचा विस्तार झाल्यावर त्याचे प्रत्यंतर येथेही आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्याोगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील. त्याच बरोबर ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव, राजन साळवी यांनाही त्यांच्या पक्षाचे आव्हान राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. भाजपसाठी सिंधुदुर्गमधील जागा महत्त्वाच्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button