Tirupati Balaji Temple’s Ladoo – तिरुपती बालाजी मंदिराचा लाडवाचा इतिहास म्हणजे नेमके काय?
जगातील श्रीमंत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडवांच्या प्रसादाबद्दल सध्या वाद निर्माण झाला आहे. तिरुपतीला दर्शन केल्यानंतर भाविक लाडू आवर्जून आणतात. घरी आल्यावर हा प्रसाद वाटला जातो. तिरुपती – तिरुमला देवस्थान दररोज सुमारे तीन लाख लाडू तयार करते.
या ठिकाणी 600 आचारी असून 6 वेळा आतापर्यंतच्या इतिहासातील पाककृतीत बदल करण्यात आला आहे.
10टन बेसन पीठ, 10 टन साखर, 700 किलो काजू,150 किलो वेलची, 540 किलो बेदाणे, 300 ते 400 लिटर तूप आदी सामग्री वापरून हे लाडू बनवले जातात.
3 ते 5 लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनवले जातात. यात 60 ग्राम,175 ग्राम आणि 750 ग्राम अशा तीन प्रकारच्या वजनांमध्ये लाडू मिळतो. 50 रुपयांत मध्यम आकाराचा तर 200 रुपयांत मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो.
हे लाडू 15 दिवस टिकतात.
यातून देवस्थानला 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त होतो.
1715 पासून तिरुपती बालाजीला लाडवांचा प्रसाद दाखवण्यास सुरुवात झाली.
2014 मध्ये भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय प्राप्त झाले. यामुळे, केवळ तिरुपती – तिरुमला देवस्थानला लाडू बनवण्याचा आणि त्याच्या वितरणाचा अधिकार आहे. मंदिराच्या स्वयंपाकगृहात लाडू तयार केले जातात. या जागेला पोटू म्हणतात. पोटूत स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते. प्रत्येक आचाऱ्याच्या चमूने बनवलेला पहिला लाडू बालाजीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्या नंतर प्रसादाच्या रूपात भाविकांना वाटप सुरू होते. दर्जेदार साहित्यातून वैशिष्ठ्यपूर्ण चवीचे लाडू तयार केले जातात.