Trapped by Sharad Pawar – शरद पवारांच्या फिल्डिंगमुळे दादांच्या मंत्र्यांची विकेट जाणार?
लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील मंत्र्यांना पाडण्यासाठी फिल्डींग लावली आहे. अजित पवारांच्या मंत्र्यांविरोधात शरद पवारांनी ट्रॅप लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत हिट ठरलेला मॅन टू मॅन मार्किंग फॉर्म्युला वापरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदारांना नाकीनऊ आणण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे.
अजित पवारांच्या मंत्री, आमदारांना पाडण्यासाठी शरद पवार लावत असलेली फिल्डींग भाजपला महागात पडू लागली आहे. अजित पवारांचे अनेक आमदार, मंत्री २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करुन विजयी झाले. आता अजित पवार गटच महायुतीत आल्यानं गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या अनेकांना यंदाची निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरु झाली आहे. आमदारकी लढवण्यासाठी उत्सुक असलेले भाजपचे अनेक नेते पवारांच्या संपर्कात आहेत.